Breaking News

अण्णासाहेब महामंडळ प्रकरणे विनातारण निकाली काढा-आ.मेटे

बीड,(प्रतिनिधी):अण्णासाहेब पाटील महामंडळ कडुन मराठा समाजातील युवकांना विनातारण कर्ज देण्याचे स्पष्ट संकेत असतांना काही बँक अधिकारी तारणाचे कारण दाखवत युवकांना हेलपाटे मारायला लावत आहेत. हि बाब शिवसंग्राम तालुकाध्यक्ष सचिन कोटुळे यांनी आ. विनायक मेटे साहेब यांच्या लक्षात आनुन दिली.
आ. मेटे साहेब यांनी तात्काळ बँक अधिकार्यांना तंबी देण्यात आली. अधिकार्यांनी युवकांना १० लाखाचे कर्ज कोणतेही तारण न मागता तात्काळ वाटप करावे. जिल्हा प्रशासनास समक्ष सरकाने बजावले आहे. असे असतांना युवकांना ताटकाळत ठेवले तर याद राखा अशा शब्दात आ. विनायक मेटे यांनी बँक अधिकार्यास बजावले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत बीड येथे बँक अधिकार्यांची बैठक झाली होती. ज्यामध्ये विनाकारण त्रास न देता कर्ज वाटप करण्याचे आदेश देवुनही बँक अधिकारी वृत्ती बदलायला तयार नाहीत. वरवटी येथील मराठा तरूण राजेंद्र सखाराम शिंदे यांनी पाली कॅनरा बँक शाखेत कर्ज प्रकरण दाखल केले आहे. 

एनक दिवसापासुन चकरा मारल्या आहेत. बँक कर्ज देण्यास तयार आहे परंतु तारण दयावे लागेल ही आट बँके ने घातली आहे. आदेश देवुनही बँक तारण मागत आहे. शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन कोटुळे यांनी हि बाब आ. विनायकराव मेटे यांच्या निदर्शनास आनुन दिली असता त्यांनी कॅनरा बँकेच्या मॅनेजर रितेश कुमार यांच्याशी संपर्क साधुन विनातारण कर्ज देणे बाबत खडसावले आहे. 
युवकांनी आण्णासाहेब पाटील कर्ज प्रकरण मंजुरीसाठी बँक अधिकारी त्रास देत असतील तर त्यांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड व शिवसंग्राम भवन येथे करावी असे अवाहन त्यांनी केले आहे.