Breaking News

निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश.


शेवगाव/प्रतिनिधी
नुकताच संपन्न झालेल्या इंदापूर पुणे येथील 64 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल शेवगावचे खेळाडू फिरदोस मुजीब शेख व सुशांत सुनील काकडे यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले. व त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे संघास सुवर्णपदक प्राप्त करण्याची संधी याद्वारे महाराष्ट्र संघास संधी मिळाली. या अप्रतिम कार्यासाठी विद्यालयाचे व जनशक्ती क्रीडा व युवा विकास मंडळ अहमदनगर सहकार्य केले. निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल शेवगावचे समन्वयक डॉ. सायली काकडे, प्रा. प्रकाश व्यास, सतीश कुरे, प्रमिला खिलारी, यांनी शालेय स्तरावर खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या खेळाडूंना स्कूलचे क्रीडा शिक्षक अविनाश हंडाळ, सी. बी. एस. सीचे टिम, मॅनेजर कल्पेशजी भागवत, गणेश शिरसाट, आकाश मोहिते, यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले याबद्दल देखील क्रीडाशिक्षक अविनाश हंडाळ सर यांचे कौतुक पालकवर्गातून मुजीब शेख सुनील काकडे यांनी केले.