Breaking News

देशाला आघाडीशिवाय पर्याय नाही-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य; भाजप सरकारवर सडकून टीकापुणे; डिसेंबर : देशाला आघाडी शिवाय पर्याय नाही. आम्ही समविचारी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षाचं स्थान महत्वाचं आहे. त्या राज्यात त्या पक्षाला महत्त्व द्या असा नवीन प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला आहे त्याला पाठिंबा मिळत आहे अशी माहितीही पवारांनी दिली.


पुण्यात आज राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीकाही केली.
जातीजातीत अंतर वाढवलं जातंय. राजस्थानमध्ये राजपूत आणि जाट यांच्यात अंतर आहे, महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला अशी टीका पवारांनी केली.