Breaking News

विक्रमसिंह पाटणकरांच्या अमृतमहोत्सवानिमित्त बुधवारी कुस्त्यांचे जंगी मैदान


पाटण (प्रतिनिधी) : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त येथील मार्केट यार्डमध्ये बुधवार दि. दोन जानेवारी रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात महाराष्ट्रकेसरी बाला रफीक तसेच इतर नामवंत मल्लांचा सहभाग असणार आहे. तसेच यावेळी पै. हर्षदा चव्हाण (सुपनेविरूध्द पै. समृध्दी पाटील (चाफळ), पै. जयंती पाटील (कोल्हापूर) विरूध्द पै. वैशाली साळुंखे (किवळ) या महिलांच्या प्रेक्षणीय कुस्त्याही आयोजित केल्या असल्याची माहिती अमृतमहोत्सव कुस्ती नियोजन समितीतर्फे देण्यात आली आहे. 


या मैदानात हिंदकेसरी पै. संतोष वेताळ (आबा), डबल महाराष्ट्रकेसरी चंद्रहार पाटील, कालेतील पै. नानासाहेब पाटील, छत्रपती पुरस्कारविजेते मुंबईचे पै. आनंदा शिंदे, आटकेतील पै. धनाजी पाटील (काका), कराड तालुका कुस्ती संघटक तानाजी चवरे, एनआयएस साताराचे कुस्ती कोच प्रा. दिलीप पवार, उपमहाराष्ट्र केसरी नारायणवाडीचे पै. जयकर खुडे, महाराष्ट्र चॅम्पियन सुपनेचे पै. प्रशांत पाटील, धामणीचे पै. रखमाजी नेर्लेकर, कुस्ती कोच कुंडलचे पै. सुनील मोहिते, म्हासोलीचे पै. शहाजी साळुंखे, कुस्ती कोच प्रा. अमोल साठे, वारणाचे पै. संदीप पाटील, विरवडेचे पै. सतीश डांगे, बनपुरीचे पै. अविनाश पाटील, क्राईम ब्रँच मुंबईचे पै. चंद्रकांत पुजारी, सहाय्यक फौजदार साताराचे पै. शत्रुघ्न कोळी, सांगवडचे पै. बाळासाहेब कुंभार, मुंबई पोलीस अशोक डिगे, कालेचे पै. दत्ता पाटील, कराडचे पै. सुदाम पावणे, सुपनेचे पै. शिवाजी पाटील, पै. दाजी माळी, पै. जगन्नाथ गायकवाड, उंब्रजचे पै. जगन्नाथ गायकवाड, प्रा. प्रल्हाद जाधव, राजन काळे, अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या मैदानात प्रथम क्रमांकासाठी कुस्ती मैदानात नुकताच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविणारा पुण्याचा बाला रफीक विरूध्द कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात 2 लाखांच्या इनामाची कुस्ती होणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी जालनाचा विलास डोईफोडेविरूध्द गारगोटीचा समीर देसाई यांच्यात दीड लाखाच्या इनामाची, तृतीय क्रमांकासाठी कोल्हापूरचा सिकंदर शेख विरूध्द विक्रम पारखे यांच्यात एक लाख इनामाची, चतुर्थ क्रमांकासाठी पुण्याचा संतोष पडळकर विरूध्द कोल्हापूरचा नवनाथ इंगळे यांच्यात 75 हजार रुपये इनामाची, पाचव्या क्रमांकासाठी कुंडलचा संभाजी कळसे विरूध्द कोल्हापूरचा विश्‍वास कारंडे यांच्यात 51 हजार रुपयांची, सहाव्या क्रमांकासाठी कराडचा अक्षय मोहिते विरूध्द कुंडलचा अक्षय कदम यांच्यात 51 हजार रुपये इनामाची कुस्ती होणार असून या नामवंत मल्लांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या कुस्त्या शौकीनांना पहायला मिळणार आहेत.तसेच अमर पाटील (कुंडल) विरूध्द योगेश दोडके (पुणे), नामदेव केसरे (वारणा) विरूध्द तुषार निकम (कुंडल), सुरज पाटील (कुंडल) विरूध्द शैलेश म्हस्के (मुंबई), शुभम कोळी (कुंडल) विरूध्द वैभव डोंब (सैदापूर), ओमकार मदने (कुंडल) विरूध्द समीर शेख (पुणे), रामा माने (वारणा) विरूध्द रोहन भोसले (कुंडल) यांच्यासह कुठरे, म्हावशी, येरफळे, म्हासोली, सुरूल, सुपने, अडुळ, कुंडल, वारणा, कराड, इस्लामपूर, काले, वाघेरी, रेठरे, पारगाव, मुंबई, पुणे, सैदापूर, बोंद्री, चाफळ, सोनवडे, साखरी, येराडवाडी, त्रिपुडी, बेलवडे, नाडोली, सुळेवाडी, कडेगाव, वाटेगाव, ओंड येथील मल्लांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.कुस्ती मैदानात निवेदक म्हणून पै. ईश्‍वरा पाटील (वारणा), पै. सुरेश जाधव (चिंचोली), पै. मधुकर घाडगे (म्हावशी), हलगीवादक सचिन आवळे (गारगोटी), तुतारीवादक मिलींद गुरव (पाटण) हे काम पाहणार आहेत. हे कुस्त्यांचे मैदान बुधवार, दि. 2 रोजी दुपारी दोन वाजता सुरू होईल. तसेच एक नंबरची कुस्ती सायंकाळी सात वाजता लावली जाणार आहे. या कुस्त्यांचा पाटण व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.