Breaking News

शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत खोटे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर लांडे


वडवणी (प्रतिनिधी)- वडवणी तालुक्यातील सोन्ना-खोटा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालय शिक्षण व्यवस्थापन समितीची काल (दि.१७) रोजी सोमवारी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत (आबा) विठ्ठल खोटे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर वैजनाथ लांडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक शिवराम भाऊ खोटे, केशव खोटे, सिद्धेश्वर खोटे, लक्ष्मण खोट, नानासाहेब खोटे, शवाजी लांड, तुकाराम लांडे, राजेश डोंगरे, अंकुश डोंगरे, देविदास लोकरे, गणेश टीकुळे, सलीम सय्यद परसराम ताकपेर, गणेश खोटे, कैलास लांड, इंदारराव लांडे, अनंत खोटे, तसेच शिक्षक वर्ग मुंडे सर मुळे सर आळने सर बोकारे सर आणि मॅडम तसेच सर्व गावकरी उपस्थित होते. गावकर्‍यांच्या वतीने चंद्रकांत खोटे व रामेश्वर लांडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.