Breaking News

तलवारीने वाढदिवसाचा केक कापल्याने युवकावर गुन्हा दाखलपाथर्डी/प्रतिनिधी
तालुक्यातील कोरडगाव येथील अभिजित देशमुख व विनोद गवळी दोन युवकांनी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक कापण्यासाठी तलवार वापरल्याने त्याच्यावर पाथर्डी पोलीस 1 डिसेंबर रोजी स्टेशनमध्ये आर्म ऍक्टच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून 2 डिसेंबर रोजी त्याना कोर्टाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती या बिटचे अंमलदार राजने यांनी दिली आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत अभिजित देशमुख याने केक कापण्यासाठी तलवार वापरल्याचे छायाचित्र मिळाले होते. त्यानुसार शेवगाव येथील अधिकारी मंदार जवळे यांचे पथक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे रमेश रत्नपारखी, मुंडे, शेखर डोमाळे यांच्या पथकाने संयुक्तपणे कोरडगाव येथील स्वप्नील उर्फ अभिजित देशमुख याला ताब्यात घेऊन तलवारी बाबत चौकशी केली असता सदरील तलवार विनोद गवळी यांच्या घरातून जप्त केली. असून त्यांच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी शेखर डोमाळे यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट गुन्हाची नोंद केली आहे.