Breaking News

वाईच्या पोलीस निरीक्षकपदी चंद्रकांत बेदरे


वाई (प्रतिनिधी) : वाईच्या पोलीस निरीक्षकपदी चंद्रकांत बेदरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडून पदभार स्विकारला.

बेदरे सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून गेली चार वर्षे काम पाहत होते. तेथून त्यांची वाई येथे तर वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांची वाईतून सातारा येथे वाहतूक शाखेत बदली झाली आहे. बेदरे हे मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक या गावातील आहेत. स्पेशल पोलीस युनिटमध्ये कार्यरत असताना अति महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. याबाबत त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तद्नंतर पदन्नोतीने जुलै 2014 मध्ये सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी चार वर्षे काम केले. त्यानंतर वाई पोलीस ठाण्याचा कारभार त्यांनी नुकताच स्विकारला. वाईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितली.