Breaking News

दलिताचे घर जेसीबी ने उद्धवस्त केले


माजलगाव, (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबेगाव येथील गुलाबराव महादु शिनगारे हा दलित समाजातील व्यक्ती त्याची उपजिविका भागविण्यासाठी मिस्त्री कामाकरिता औरंगाबाद येथे कुटुंबासह गेला होता पण त्यांचे वडिलोपार्जित घर आबेगाव, ता.माजलगाव, जि.बीड येथे होते पण गावातील प्रस्थापित तसेच जि.प.बीड चे पात्रुड गटातुन रा.कॉं.चे सदस्य तथा तुळजाभवानी मल्टी स्टेट चे चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी शिनगारे यांच्या घराला जेसीबी लावून उद्धवस्त केल्या च्या फिर्यादी वरुन चंद्रकांत शेजुळ सह चौघांविरोधात अँट्रासिटी कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गुलाबराव शिनगारे यांनी माजलगाव ग्रामीण पो.स्टे.मध्ये १२डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते उपजिविका भागविण्यासाठी औरंगाबाद येथे असताना त्यांच्या वडिलोपार्जित घरावर संजय बंन्सीधर शेजुळ,प्रकाश बाबासाहेब शेजुळ,भागवत प्रकाश शेजुळ यांनी संगनमताने जेसीबी लाऊन घरपाडले आणि त्याचा मलबा ट्रकने उचलून टाकला होता याची तक्रार ३/१०/२०१७ला शिनगारेंनी दिली होती पण यात अवमेळ झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता म्हणून नवीन फिर्यादी नुसार वरिल चार आरोपी विरोधात भादंवि.कलम ४४७,३(१).एफ३(१).(जी),३(२).र्(ींर).अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यागंभीर प्रकरणाचातपास माजलगाला नव्यानेआलेले उपविभागीय पोलीस अधीक्षक सावंत हे करीत आहेत.