Breaking News

आंबेजोगाई सहकारी कारखाना सुरू करण्याच्या आडसकरांचा प्रयत्नअंंबेजोगाई (प्रतिनिधी )गेली वीस पंचेविस वर्षापासून सर्वात जुना असलेला आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना दोन वेळा राज्य शासनाने अवसायानात काढल्यानंतर या कारखान्याने आडसकर नावाला राजकारणात प्रतिष्ठा दिली त्यामुळे हा कारखाना कितीही आर्थिक नुकसान झाले तरी चालवायचा हा निश्चय रमेश आडसकर यांनी केला कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांचे सहकार्य घेत आडसकर यांनी अंबा कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला आज तो यशस्वी होत असल्याने शेतकरी आडसकर यांना धन्यवाद देत आहेत. आंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत स्वर्गीय डी एन पाटील यांच्या योगदानाला कुणालाही नजरेआड करता येणार नाही मात्र त्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांनी अंबा कारखान्यावर पकड मजबूत करत केज- आंबेजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणली त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघातून ज्याला निवडणूक लढवायची त्यांना आडसकर यांच्या मदतीची गरज पडायची आंबा कारखान्याच्या माध्यमातून आडसकर कुटुंबाचा राजकारणात दबदबा होता रमेश आडसकर राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राष्ट्रवादी ते भाजप असा राजकीय प्रवासामुळे मध्यंतरी कारखान्याकडे दुर्लक्ष झाल्याने कारखाना अवसायानात निघाला होता. 

गेल्या वर्षी पाऊस चांगला पडल्याने ऊस लागवड क्षेत्र वाढले कारखाना सुरू करण्याचा आडसकर यांनी निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात कोणतीच बँक कर्ज द्यायला तयार नव्हती काय करायचे आडसकरा समोर प्रश्न होता कारखाना कसा सुरू करायचा त्यांनी मित्राकडून वैयक्तिक कर्ज घेऊन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बाब कामगारांना समजली कधी नव्हे ते कामगारांनीही साथ देण्याचा निर्णय घेतला राजकारणात मोदींच्या पाठीशी आडसकर खंबीरपणे उभे असतात मात्र कारखाना चालवण्यासाठी मदतीची गरज होती बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी क्षणाचाही विलंब न करता शक्य ती मदतीची ताकद आडसकर यांच्या पाठीशी उभा केली आज आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना परिसरात उसाने भरलेल्या गाड्यांचा ताफा कायम दिसत आहे आंबेजोगाई साखर कारखान्याची मशिनरी अत्यंत जुनी असूनही या कारखान्याभोवती नव्याने स्थापन झालेल्या कारखान्यापेक्षा चांगली गाळपक्षमता आंबा कारखान्यात असल्याने ५५हजार मे टन ऊस गाळप झाला असून येत्या दोन महिन्यात किमान दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रमेश आडसकर यांनी सांगितले यापूर्वी हंगाम चालण्यासाठी किमान साडेआठशे कर्मचारी काम करत होते त्यात कपात करून सहाशे ते साडे सहाशे कर्मचार्‍यावर कारखाना योग्य गतीत सुरू आहे नवीन कारखान्यापेक्षा चांगल्या क्षमतेने अंबा कारखाना गाळप करत असल्याने चेअरमन रमेश आडसकर व त्यांचे संचालक मंडळाला शेतकरी धन्यवाद देत आहेत

डिस्टलरी प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न अंबा कारखाना बंद असताना सुरू करण्यासाठी कर्मचारी, सभासद ,ऊस उत्पादक शेतकर्‍यांची साथ महत्त्वाची असून पाऊस नसल्याने भविष्यात उतारा कमी येण्याची शक्यता आहे त्याची भरपाई शेतकर्‍यांना करण्यासाठी डिस्टीलरी प्रकल्प सुरू करणे आवश्यक असून तसा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत रमेश आडसकर चेअरमेन,अंबा कारखाना मोबाईल वापरावर बंदी अंबा कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अनेक वेळा सूचना देऊनही कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास आल्याने संचालक मंडळाच्या सूचनेनुसार कामगारांनी कारखाना परिसरात मोबाईलचा वापर करू नये यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर नोटीस डकवण्यात आली आहे अशी माहिती कार्यकारी संचालक श्री साखरे यांनी दिली