Breaking News

जागतिक एडस् नियंत्रण दिनानिमित्त जनजागृती रॅली
नगर । प्रतिनिधी -
जागतिक एडस् दिनानिमित्त (दि. 1 डिसेंबर) जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण  विभागाने जिल्हा रुग्णालय येथून जनजागृती रॅली काढली. या रॅलीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुनील पारधे, डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एन. दहीफळी, एआरटी केंद्राचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ठवाळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अ‍ॅड. शेखर दरंदले आदी उपस्थित होते.
डॉ. मुरंबीकर यांनी राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सेवासुविधांबाबतची  माहिती दिली. 
एचआयव्हीबाबत पटनाट्य झाले. उपस्थितांना एडस् जनजागृतीपर शपथ  दिली. रॅलीचा प्रारंभ जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणातून झाला. अप्पू हात्ती चौक-सर्जेपूरा-बागडपट्टी- सिध्दीबाग-न्यू आर्टस् महाविद्यालयमार्गे जाऊन पुन्हा जिल्हा रुग्णालय प्रांगणात समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्हा रुग्णालयीन नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज, रचना महाविद्यालय, काकासाहेब म्हस्के नर्सिंग कॉलेज, आनंदऋषी नर्सिंग कॉलेज, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेज, दादासाहेब रुपवते ज्युनिअर कॉलेज, ट्रेनिंग कॉलेज ऑफ  नर्सिंग, प्रयत्न नर्सिग कॉलेज, डी.एड. कॉलेज, विखे पाटील  नर्सिंग सेंटर, लायन्स क्लब, रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सेंटर सेव्हीयर्स इंग्लिश हायस्कूल, सेंट मोनिका डी. एड. कॉलेज, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच स्नेहालय संस्था, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, आटीआय संस्था, एनएडीपी विहान संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.