Breaking News

ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन.


भाविनिमगाव/प्रतिनिधी
6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तीला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शेवगाव तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिली. या स्पर्धेसाठी मराठा आरक्षणाचे फलीत, जलयुक्त शिवार-काळाची गरज, शेती व शेतकर्‍याची भविष्यकालीन परिस्थिती किंवा शेतकरी आजचा व उद्याचा, ग्रामीण पत्रकारीता व समाजाच्या अपेक्षा हे विषय निबंध स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. 

एका विषयावर स्वहस्ताक्षरात निबंध लिहून पाठवयाचा आहे. स्पर्धेसाठी प्रत्येकी 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे. फी बाळासाहेब मुरलीधर जाधव यांच्या नावाने डिडी अथवा मनीआँँर्डर पाठविण्यात यावी. निबंध स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे. बक्षिस अनुक्रमे 500, 300, 200, 100 रु. रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देवून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. तर प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासकीय, पत्रकारिता, उद्योग, आरोग्य, प्रगतशील शेतकरी, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विजेते स्पर्धकाचे व पुरस्कारानी सन्मानित करणारांची नावे दि.3 जानेवारीला जाहीर करण्यात येतील.दि.6 जानेवारीला बक्षीस वितरण, आदर्श पुरस्कार प्रदान व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव प्रशासकीय अधिकारी, जेष्ठ पत्रकार, राजकीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी निबंध स्पर्धेत भाग घेवू इच्छिणार्‍या स्पर्धकांनी व विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तींनी दि.25 डिसेंबर पर्यंत दोन पासपोर्ट फोटोसह निबंध व उल्लेखनिय कामाची माहिती बाळासाहेब मुरलीधर जाधव मु.बक्तरपूर पो.देवटाकळी ता.शेवगाव जि.अहमदनगर पिन-414502 (मो.9921745266) या पत्यावर पाठविण्यात यावी. पाकिटावर विषयांचा स्पष्ट उल्लेख करावा. उशिरा येणार्‍या निबंधाचा व पुरस्कार प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह खुल्या वर्गातील स्पर्धकांनी स्पर्धेत, तर उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवून सहभागी व्हावे. असे आवाहन शेवगाव म.रा.ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.