Breaking News

लातूरमध्ये कार पुलावरून कोसळली, पाच ठार


लातूर (प्रतिनिधी)- लातूर- मुरूड- अकोला मार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या मार्गावरील एका पुलावरून कार 15 फूट खाली कोसळली असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील डिकसळ गावातून निघालेल्या कारचा लातूर- मुरुड अकोला मार्गावर अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.