Breaking News

कास्ट्राईब संघटना राज्यभर आंदोलन छेडणार : वाघमारे


सातारा (प्रतिनिधी) : कंत्राटी कामगारांना कायम करणे, मेगा भरतीमध्ये 50 टक्के पदे कंत्राटी कर्मचार्‍यांमधून भरावीत आणि झिरो पेंडसी फक्त वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांना आहे का? या विषयावर राज्यभर जनजागृती करुन सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली. 

यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले, महाराष्ट्रात 3 लाख कर्मचारी हे कंत्राटी असून त्यांच्या न्याय हक्कासाठी अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर एल्गार उभारणार आहोत. हे शासन भांडवलदारांच्या बाजूने आहे. राज्यकर्ते व भांडवलदार मिळून कंत्राटी कर्मचार्‍यांचे शोषण करत आहेत. पदोन्नतीमध्ये आरक्षणावर फार मोठे हल्ले झाले. आरक्षणासारखा गंभीर विषय संघटनेच्या सभासदांना व आरक्षण लाभार्थ्यांना माहित व्हावा, झिराश पेंडसी बाबत आस्थापना सांभाळणारे लिपीक हे दिवसाची रात्र करुन रेकॉर्ड जतन करत आहेत मात्र त्यावर स्वाक्षर्‍या करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळ नाही. मग झिरो पेंडसी हे फक्त वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांसाठीच आहे का? असा सवालही वाघमारे यांनी केला.

यावेळी संतोष भोकरे, शिवराम संगभोर, सुभाष साळुंखे, के. आर. टोणपे, एस. के. कांबळे, हणमंत डावरे, अधिक गंबरे, प्रशांत तायडे, विलास बनसोडे, रमेश जाधव, भागवत करडे, अंकुश रोकडे, महादेव भोकरे, अंजली साळवे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.