Breaking News

जिह्यातील साखर कारखानदारांचा मनमानी कारभार थांबवा-भाई मोहन गुंड


बीड (प्रतिनीधी)- बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारानी मनमानी लावली आहे स्वताच्या कार्यक्षेञ सोडुन आप आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांनच्या हाताला धरुन ऊस नेहत आहेत त्यामुळे कार्यक्षेञातील शेतकर्याच नुकसान होत आहे.

केज तालुक्यातील यडेश्वरी. आबासाखर रांजनी मांजरा हे कारखाने १० ते २०./ कपातीच्या नावा खाली शेतकर्याला लुटत आहेत तर काई शेतकर्याचे पाण्या आभावी ऊस वाळुन जात आहे त्यांचे पंचनामे करन्याची मागणी शेकापचे मध्यवर्ती समीती सदस्य भाई मोहन गुंड यांनी जिल्हा आधीकारी साखर आयुक्ताकडे केली आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याने सुरु बोऊन एक महिना होत आला आहे अद्याप शेतकर्यांचा ऊसाचे पैसे दिलेले नाहीत.माजलगाव तालुक्यातील साखर कारखान्याने २६५जातीच्या ऊसाची नोंदच घेतलेली नाही.एन.एस.एल. शुगर्सने ऊसाच्या नोंदीत घोळ केला आहे. कारखाने सुरु होवुन एक महिना होत आला आहे. अद्यापहि काही ऊसाच्या नोंदी नाहीत त्यामुळेया परिसरातील शेतकरी हैरान झाला आहे. तर दुष्काळजन्य परिस्थीती आणि सहकारी साखर कारखान्यांचे सुलतानी धोरन शेतकर्यांच्या मुळावर आले आहे. 

शेतकर्यांनी आपल्या शेतातील ऊस सहकारी साखर कारखान्यांना दिला, मात्र त्या ऊसाचे बील शेतकर्यांना अद्यापही दिले गेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आणखीनच अडचनीत सापडला आहे.बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वत:ची मनमानी थांबवुन रितसर नोंदीप्रमाने तसेच जयमहेश कारखीना यांनी नोंदी कारखान्यांनी गहाळ केलेल्या आहेत त्या शेतकर्यांच्या ऊसाची तात्काळ नोंदी घ्याव्यात.ज्या शेतकर्यांच्या ऊसाचे गाळप झालेले आहे अशा शेतकर्यांची बिले येत्या चौदा दिवसाच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग नाही झाल्यास कपात केल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलनाचा ईशारा निवेदनात जिल्हाअधिकारी साखर आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड आँड नारायण गोले भिमराव कुटे प्रविण खोडसे आमोल थोरात यांनी दिला आहे.