Breaking News

लोकअदालतीतील प्रकरणे पक्षकारांनी सामोपचाराने मिटावावीत : खान


सातारा (प्रतिनिधी) : प्रलंबित 50 हजार प्रकरणे आज होणार्‍या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवली आहे. पक्षकारांची आपली जास्तीत जास्त प्रकरणे आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एस. जे. खान यांनी केले. 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, मुंबई यांनी तयार केलेल्या न्याय सबके लिये हे गीत उपस्थितांना दाखवून प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एस. जे. खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्र. अ. कुंभोजकर, न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अंकुशराव जाधव, विधीज्ञ, प्रबंधक, पक्षकार यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.

आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीत थकीत दूरध्वनी देयके, घरपट्टी, पाणीपट्टी, वादपूर्व प्रकरणे, प्रलंबित दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात दावे, बँक दावे, वैवाहिक वाद इ. प्रकरणे ठेवण्यात येणार आली आहे. 
पक्षकारांनी उत्साहाने सहभाग नोंदवून या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश खान यांनी शेवटी केले.