Breaking News

गायकरवाडीत अखंड हरिनाम सप्ताहकुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे गीता जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्‍वरी पारायण तसेच श्री संत सद्गुरु गोदड महाराज चरित्र वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी या सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे. सप्ताहाचे हे तेहतीसावे वर्ष आहे. गुरुवारी व शुक्रवारी अनुक्रमे हभप शांतीलाल महाराज जंजिरे व गोविंद महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा झाली. शनिवारी कालिदास महाराज काळे, रविवारी गणेश महाराज चौधरी, सोमवारी मारकड महाराज भिगवनकर, मंगळवारी अर्चना ताई गिरी महाराज, बुधवारी शामसुंदर महाराज ढवळे यांची कीर्तने होणार आहेत. गुरुवारी नगरसेवक डॉ.संदीप बरबडे यांच्या सौजन्याने हभप प्रकाश महाराज जंजिरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे अशी माहिती संजीवन महाराज गायकवाड यांनी दिली. सप्ताहादरम्यान प्रवचनकार तुकाराम पवार, पंढरीनाथ काकडे, तेजस गायकवाड, अक्षय गायकवाड, कमाल खुळे, मारुती थिटे, संजीवन महाराज गायकवाड यांची प्रवचने होत आहेत. या सप्ताहात काकडा, पारायण, गाथा भजन, चरित्र वाचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.