Breaking News

महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मनिषा वाघमारे भारीपमध्येबुलडाणा,(प्रतिनिधी) लोणार येथील महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मनिषा ग्यानुबा वाघमारे यांनी भारीप बहुजन माहसंघामध्ये प्रवेश घेतला. 5 डिसेंबर रोजी भारीप बहुजन माहसंघाची जिल्हा बैठक बुलडाणा येथे पार पडली या बैठकीत भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाउ सोनोने व भारीपचे नेते मो. सज्जाद यांच्या नेतृत्वात सौ. वाघमारे यांनी प्रवेश घेतला.

याच बैठकीत काँग्रेसचे अल्पसंख्याक शेलचे सचिव शे. जमिर शे.मजीद, शे. सलमान तांबोळी, मोहन जाधव देउळघाट यांनी सुध्दा भारीप बहुजन माहसंघामध्ये प्रवेश घेतला. भारीप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वावर विश्‍वास ठेवून प्रदेशाध्यक्ष अशोकभाउ सोनोने यांच्या नेतृत्वात हा प्रवेश घेण्यात आला. भविष्यात पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणीकपणे काम करू असे यावेळी मनिषा वाघमारे यांनी सांगीतले. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णु उबाळे,जिल्हा महासचिव मुमताज खान, संघटक प्रशांत वाघोदे, लोणारचे संघपाल पन्हाळे, बाळा राउत आदि उपस्थित होते.