Breaking News

विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे आंदोलन.


शेवगाव/प्रतिनिधी
 शेवगाव तालुक्यातील सुकळी गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा लक्ष्मी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुकळी ग्रामस्थांनी शेवगाव तहसील कार्यालय आवारात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन पुकारले होते. यावेळी नायब तहसीलदार मयुर बेरड, पुरवठा अधिकारी नितीन बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर पुरवठा अधिकारी नितिन बनसोडे यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी स्वस्त धान्य दुकान दाराचा परवाना रद्द करुन त्वरित दुसर्‍या व्यक्तीकडे पुरवठा वितरणाची जबाबदारी देण्यात यावी. 
सर्व कार्डधारकांना ऑनलाईन पद्धतीने बायोमॅट्रीक पद्धतीने त्वरीत धान्य वितरण करण्यात यावे. अपंग व वृद्धांना घरपोहोच रेशन मिळावे दि.21 रोजीच्या ग्रामसभा ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी. आदी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी स्विकारले.
 या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे निलकंठ कराड, सुरेश भवर, पार्वती भवर, संदीप बामदळे, संजय नाचन, देवदत्त साळवे, ज्ञानेश्‍वर घोडके, गणेश सावंत, भानुदास भवर, शशीकला दिलवाले, जयाबाई व्हटकर, सिताबाई गरड, हिराबाई गरड, मोहन गरड, लहु भवर आदींसह सुकळी गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.