Breaking News

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना तत्काळ मोफत एसटी पासेस द्या : शिंदे बुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना परिवहन विभागाने एस. टी. च्या मोफत पासेस जाहीर केल्या आहे.परंतु जिल्ह्यातील एस टी महामंडळ पासेस देण्यास टाळाटाळ करीत असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी,विद्यार्थिनी मोफत पासेसच्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ मोफत एस टी पासेस देण्यात यावी, अशी मागणी माजी आ.विजयराज शिंदे यांनी निवेदनाद्वारे 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी स्वीकारले .

 जिल्ह्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दहावी पर्यंत च्या मुलींना अगोदरच मोफत शैक्षणिक प्रवास जाहीर झालेला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे दहावी नंतरच्या सर्व मुली व शिक्षण घेत असलेले सर्व मुले ह्या मोफत पासेससाठी पात्र ठरलेले आहे. परंतु, एस टी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे मुले मुलींना पासेस मिळत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत ही पालकांना पैसे खर्च करून मुलांना शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे.हजारो विद्यार्थी आजही स्वत: खर्च करून पास काढत आहे.आजच्या तारखेत काढलेल्या पासचे फोटो सोबत देत आहे. एस टी च्या मोफत पासेस देण्यासाठी तालुका व डेपो निहाय महामंडळाने स्वतंत्र कक्ष स्थापन करून तत्काळ पासेस देण्याची व्यवस्था करण्यात येण्यासाठी आपले स्तरावरून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करून तत्काळ पासेस न दिल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना बाजार समिती संचालक अर्जुन दांडगे , ओमसिंग राजपूत, सुदाम काकड, गजानन पवार ,महेंद्र बोरकर ,सचिन व्यास,लक्ष्मण पर्‍हाड,तुषार शिपणे,शिवानंद पवार ,शिवाजी पर्‍हाड,चंद्रकांत काटकर, नंदकिशोर गायकवाड, गणेश राजपूत, विकास राजपूत,सत्यवान काळे यांची उपस्थिती होती.