Breaking News

दुष्काळमुक्तीसाठी जिल्हाप्रमुख खांडेंनी हाती घेतला टिकाव!बीड(प्रतिनिधी):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना दुष्काळग्रस्तांसाठी शक्य होईल तेवढी मदत देण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना हा दुष्काळग्रस्तांची बाजू मांडणारा एकमेव पक्ष असून बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी काल बीड तालुक्यातील पोखरी येथे ग्रामस्थांच्या एकीतून गाव पाणीदार करण्याच्या मोहिमेत स्वतः टिकाव हाती घेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी येत्या काळात तालुक्यात जिथेजिथे श्रमदानातून गाव पाणीदार करण्याची मोहीम सुरु होईल तिथेतिथे शिवसेना व शिवसैनिक सहभागी होईल असे यावेळी जाहीर केले.

 बीड तालुक्यातील पोखरी (मैंदा) येथे नाबार्डच्या अर्थसाहाय्याने निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पोखरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या श्रमदानात गेल्या २ दिवसांपासून ग्रामस्थांसोबत शिवसैनिक व युवासैनिक सहभागी होत आहेत.

 काल युवासैनिकांच्या सहभागानंतर आज शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी या श्रमदानात सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी श्रमदात्यांसोबत संवाद साधत, येत्या काळात तालुक्यात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून दुष्काळ निवारण्यासाठी आयोजित श्रमदानात शिवसैनिकही सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे सांगत दुष्काळ हटाव मोहिमेत शिवसेनेच्या भूमिकेबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी व शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी स्वतः टिकाव व फावडे हातात घेत श्रमदानात सहभाग नोंदवला. या श्रमदान मोहिमेत येथील शिवसेना उपसरपंच अशोक असवले यांनी दोन दिवसांचे अन्नदान दिले आहे तर नाथ फाऊंडेशनने सर्व श्रमदात्यांना पाणीपुरवठा निशुल्क दिलेला आहे