राम मंदिरासाठी भीक नको, कायदा कराः भय्याजी जोशी


नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी राम मंदिरप्रश्‍नी अध्यादेश लागू करण्यासाठी मोदी सरकारवर दबाव आणण्याचे हिंदू संघटनांचे प्रयत्न सुरूच आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेचे हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर धडकले. या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संबोधित केलं. ’राम मंदिरासाठी भीक मागत नाही, कायदा करावा,’ असा म्हणत त्यांनी मोदी सरकारला अल्टिमेटम दिला. 

हिंदुस्तान मुळातच हिंदूंचा देश आहे. आम्ही प्रेमळ असल्यामुळे आम्ही सर्वधर्म समभाव जपला, असे सांगून अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या टिप्पणीवरही जोशी यांनी भाष्य केले. न्यायालयाने आपली प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे. लोकांच्या भावनेचा आदर करायला हवा, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. सत्तेत बसणार्‍या लोकांनी राम मंदिर बांधण्याची घोषणा केली. आता हे आश्‍वासन पाळण्याची वेळ आली आहे. सरकारने सोडलेला संकल्प पूर्ण करायला हवा. सत्ताधार्‍यांनी जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा. आम्ही भीक मागत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले. 

संसदेच्या अधिवेशनाआधीच विश्‍व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी रविवारी दिल्लीत रॅली काढली. यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. केंद्र सरकारने राम मंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अशी मागणी या रॅलीद्वारे करण्यात आली. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget