Breaking News

दुष्काळजन्य परिस्थितीची केंद्रीय पथकाने केली पाहणीकर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्‍वरी येथे पवार वस्ती येथे केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने भेट देत पाहणी केली. तसेच जळालेल्या फळ बागा, पिके पाहिली. प्यायला पाणी न्हाई, जनावरांना चारा किती दिवस पुरेल सांगता येत न्हाई. पावसाळ्याला उनपूर एक वर्ष जायचंय अशी कैफियत डाळिंबाची बाग जळालेल्या विलास पवार, रवींद्र पवार, कांदा पाण्याअभावी राख झालेल्या श्रीराम पवार व शिवाजी पवार यांनी मांडली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ठिबकत होते. यावेळी पथकातील सदस्यांनी शेतकर्‍यांना विविध प्रश्‍न विचारले.

 
या पथकात केंद्रीय भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे एम. जी. टेंभूर्ण, विजय ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह शिर्डीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदींचा समावेश होता.

 ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसभापती किरण पाटील, बाळासाहेब सपकाळ आणि राजेंद्र डुबल यांनी माहिती दिली. अशोक खेडकर, प्रशांत बुद्धिवंत, अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, उपअभियंता दिलीप कानगुंडे, तालूक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलदीप चवरे आदी उपस्थित होते. बहुचर्चित दुष्काळाची पाहणी करण्याकरित त्रिसदस्यीय केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे तालुक्यातील टाकळी खंडेश्‍वरी येथील पवार वस्ती येथे सायंकाळी सहा वाजता आगमन झाली. पाणी आहे का चार्‍याची काय व्यवस्था जनावरे कितीकेंद्रीय समिती समोर केली. यावेळी केंद्रीय समिती सदस्य आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तालुका प्रशासनाला दुष्काळ निवारण करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या.