Breaking News

बंद पाणी पुरवठा योजना सुरु करण्याचे ‘मजीप्रा’चे आवाहन

सातारा,  (प्रतिनिधी) : कायमस्वरुपी बंद प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु असून त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील प्रादेशिक औंध-गणेशवाडी (ता. खटाव) येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश असून या योजनेमधून गुरसाळे हद्दीमधील उंच टाकी क्षमता पाच लक्ष लिटर्स या ठिकाणी 1.73 द.ल.लि. पाणी तसेच औंध- गोपूज रस्त्यावरील उंच टाकी क्षमता 5.30 लक्ष लिटर्स या ठिकाणी 2.10 द.ल.लि. पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील गावांनी, शेती संस्थांनी व उद्योजकांनी याचा लाभ घेण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, शनिवार पेठ, कराड किंवा दूरध्वनी क्रमांक 02164-229946 या कार्यालयीन दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभागाचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई यांनी केले आहे.