Breaking News

महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटना मालेगाव विभाग उपाध्यक्ष पदी पगार यांची निवडकळवण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना मालेगाव विभाग उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कळवण येथील गजानन पगार यांची निवड करण्यात आली.निवडीबद्दल नाशिक येथे महाराष्ट्र विज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने पगार यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी केंद्रीय मुख्यालय प्रतिनीधी के.वाय. बगड अध्यक्षस्थानी होते.कल्याण विभाग मुख्यालय प्रतिनीधी डि.के.जाधव ,हेमंत गादगे, कैलास सातपुते उपस्थित होते. 


महाराष्ट्र विज तांत्रिक कामगार संघटना विज कर्मचारी यांच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असुन वैचारिक व सामाजिक भुमिकेचा झंझावात सदैव राहिल असा विश्वास उपाध्यक्ष गजानन पगार यांनी व्यक्त केला.पाच वर्ष संघटनात्मक कामांची दखल घेऊन केंद्रीय सरचिटणीस सैयद झईरऊदिन यांनी हि निवड केली. यावेळी विनोद आहेर ,सुभाष खैरणार ,मंगेश परदेशी, संजय उगले ,संजय धोरकर ,दिनेश पगारे, नारायण बहिरम ,विष्णू शिरसाठ ,मनोज ठाकुर, सि.एन.जाधव, तात्या बदादे ,मनोज देवरे, योगेश ढेरिंगे, प्रविण खडसे, शरद आगळे ,प्रविण खडसे, शरद आगळे, हेमंत गवळी ,आदि मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन चंद्रकात आहेर यांनी केले.आभार हेमंत गादगे यांनी मानले.