वर्दीवर उचलला भाजप पदाधिकार्‍यांनी हात; अटक करणार्‍या पोलिसाची बदली; पोलिसांनीही दाखवला हिसका


जळगाव (प्रतिनिधी)- भाजप पदाधिकार्‍यांनी वाहन अडवल्याच्या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घालत थेट पोलिस निरीक्षकांच्या वर्दीवरच हात उचलला. त्यानंतर पोलिसांनीही या पदाधिकार्‍याला चांगल्याच खाक्या दाखवत कायद्यापेक्षा कुणीही मोठे नसल्याचा प्रत्यय दिला आणि अटक केली; पण भाजपच्या पदाधिकार्‍याला अटक करणार्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची बदली करण्यात आली. 

चोपडा शहरातील शिवाजी चौकात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची कार तपासणीसाठी आणि सीटबेल्ट न लावण्याच्या कारणावरून थांबवण्याची सूचना वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी केली; पण त्यांनी वाहन न थांबवले नाही. पोलिसांनी पाठलाग करून बाजार समितीजवळील मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची कार अडवली. कार अडवली, म्हणून वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विजय निकम आणि पाटील यांच्यात पंचायत समितीसमोर वाद सुरू झाला. पाटील यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा यांना फोन लावून बोलावले. निकम यांनीही निरीक्षक किसन नजन पाटील यांना फोन करून घटना सांगताच तेही घटनास्थळी आले.
या वेळी नरेंद्र पाटील, अनिल शर्मा आणि किसन नजन पाटील या दोघांमध्ये भांडण झाले. त्यात अनिल शर्मा यांनी नजन पाटील यांची कॉलर पकडताच पोलिसांनी या दोघा आजी-माजी शहराध्यक्षांना चोप दिला. त्यात पोलिस निरीक्षकांच्या हाताला जखम झाली. शहरात घटनेची वार्ता कळताच पोलिस ठाण्याभोवती गर्दी जमल्याने राज्य राखीव दलाची एक तुकडी बोलावून शहर पोलिस ठाण्यातील गर्दी पांगवण्यात आली. पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार कैलास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नरेंद्र पाटील, शर्मा आणि भाजपचे कार्यकर्ते मनीष पारीख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर किसनराव पाटील यांची बदली करण्यात आली. चोपड्यात राजकारण जिंकले, अधिकारी हरले अशी प्रतिक्रिया वयक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांच्या खात्यातील अधिकार्‍यांवर भाजपचे कार्यकर्तेयांवर भाजपचे कार्यकर्ते हात उचलत असतील, तर पोलिसांनी कशाच्या जोरावर गुंंड व कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई करायची, असा प्रश्‍न अधिकार्‍यांना पडला तर नवल नाही. 

कर्तव्यकठोर अधिकार्‍यांनाच शिक्षा!

पोलीस निरीक्षक किसनराव पाटील हे ’गुंड’ असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला होता. त्यांच्या बदलीची मागणीदेखील आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे पाटील यांची जळगाव पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. पाटील यांचा चोपड्यातील दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला होता. अवैध धंदे तसंच गुंडगिरी मोडून काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. भाजपचे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली होती.
.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget