मळीची वाहतूक करणार्‍या टँकरला मल्हारपेठ येथे आगपाटण, दि. 7 (प्रतिनिधी) : पाटण- कराड रस्त्यावर मल्हारपेठ हायस्कुल समोर मळीची वाहतुक करणार्‍या टँकरला अचानक आग लागुन संपुर्ण टँकरने पेट घेतला. 
 
मल्हारपेठच्या श्री संत तुकाराम विद्यालयासमोरील रस्त्यावर पाटणच्या दिशेने जाणारा व मळीने भरलेला एक टँकर (नं. एमएच 50/ 2517) पुढील टायर फुटल्याने उभा होता. मात्र आज सायंकाळी सातच्या सुमारास या टँकरने तेलाच्या टाकीसह पेट घेतला. अचानक मोठी आग लागल्याने टँकरचे मोठे नुकसान झाले. ही गाडी सुमारे एक तास जळत होती. मात्र कळवूनही घटनास्थळी आग्निशमन पथकाच्या गाड्या आल्या नाहीत. दरम्यान या जळीतामुळे कराड- पाटण मार्गावरील संपुर्ण वाहतुक ठप्प झाली होती. अचानक लागलेली आगीची घटना पाहण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी रात्री उशीरापर्यत आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget