पतसंस्थेच्या चौकशीसाठी सहकारमंत्र्यांना निवेदन


नगर । प्रतिनिधी -
वडगांव गुप्ता (ता. नगर) येथील त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्यामराव पिंपळे यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, अल्लाउद्दीन काझी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, त्रिमूर्ती पतसंस्थेच्या सन 2017-18 च्या लेखा अहवालामध्ये अतिशय गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यामध्ये पतसंस्थेने संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज दिलेले असून ते थकबाकीमध्ये आहे व आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता नाही. पतसंस्थेच्या ठेवी दुसर्‍या मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीत ठेवलेल्या आहेत व ही संस्था चालू नाही. संस्थेची इमारत नसताना बांधकाम खर्च काढला आहे. त्याची परवानगी घेतलेली नाही. संस्थेची एकच शाखा असताना संस्थेने स्कॉर्पिओ गाडी घेतली, तिचा वापर चेअरमनचे नातेवाईक करतात. त्याचा डिझेल खर्च व दुरुस्ती खर्च संस्थेतून केला जातो. संचालकांनी निवडणूक काळात ठेव पावती करणे बंधनकारक असताना त्यांनी ठेव पावती केलेली नाही.

भविष्यात ठेवीदारांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण पतसंस्थेची खातेनिहाय चौकशीचे आदेश जिल्हा निबंधक यांना करावेत, असे पिंपळे यांनी या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर श्याम पिंपळे, नारायण शिंदे, संतोष आढाव, रंगनाथ गव्हाणे, हुसेन सय्यद आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget