Breaking News

दुचाकी ट्रॉलीवर आदळून तरूण ठार


केज, (प्रतिनिधी): धारुर रस्त्यावर भवानी माळाजवळ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दुचाकीला (एमएच ४४ एल-२६०३) ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसली. यात वाजेद जीलानी अतार (१९, रा. धारूर) व त्याचा मित्र अरबाज दस्तगीर शेख ( २०, रा. बीड ) हे जखमी झाले. शुक्रवारी रात्री ते धारूरहून केजकडे जात होते. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाईला घेऊन जाताना वाजेद अतार याचा वाटेत मृत्यू झाला तर अरबाज शेख याच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.