Breaking News

शिवसेनेचा प्रचार केल्यावरुन दमदाटी आणि शिवीगाळ


नगर । प्रतिनिधी -
शहरातील नगर-कल्याण रोडवरील जाधव पेट्रोलपंपासमोर शिवसेनेचा प्रचार करीत असताना रजिया बाबासाहब शेख आणि त्यांची मैत्रिण मंगल जाधव यांना शिवसेनेचा का प्रचार का करता, असे विचारुन रस्त्यात अडवून शिवीगाळ आणि दमदाटी केली. 
याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुनील काळे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली.
महिला पोलिस पांढरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.