Breaking News

भाजपा बुलडाणा विधानसभा संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन बुलडाणा,(प्रतिनिधी):  येथील धाड रोडवरील जिजामाता स्टेडीयम समोर असलेल्या संकुलात भारतीय जनता पार्टी बुलढाणा विधानसभा संपर्क कार्यालयाचे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते आज 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कार्यालयाची फित कापून थाटात उद्घाटन करण्यात आले.

 याप्रसंगी बुलढाणा विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेंद्र गोडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस विश्‍वनाथ माळी, शहराध्यक्षा विजया राठी, माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विविध पक्ष संघटनेतील तरूण युवक कार्यकत्यांर्ंंचा भाजपाचा रूमाल गळयात घालून जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यानंतर गर्दे वाचनालयातील सभागृहात ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतीच्या क्रीडा गुणांना विकसित करण्यासाठी सीएम चषक महोत्सवाद्वारे विविध क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला.

 याप्रसंगी महिला आघाडीच्या अलका पाठक, स्मिता चेकेटकर, वर्षा पाथरकर, डॉ. प्रतिभा पाठक, रावसाहेब देशमुख, देविदास वानखेडे, नगरसेवक गोंविद सराफ, अरविंद होंडे, मंदार बाहेकर, उदय देशपांडे, नारायण तोडीलायता, अ‍ॅड. मोहन पवार, विनायक भाग्यवंत, सिद्धार्थ शर्मा, भगवान बेंडवाल, वैभव इंगळे, नितीन बेंडवाल, हर्षल जोशी, अरविंद शिंदे, अ‍ॅड. दिपक पाटील, गिरीष तातेड, दिपक वारे, प्रभाकर वारे, संजय कुळकर्णी, रवी पाटील, अशोक किलबिले,  विविध आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.