Breaking News

लूईस ब्रेल सारख्या अनेक शास्त्रज्ञांचे विकासात मोठे कार्य- आव्हाड

  
जामखेड/प्रतिनिधी 
लूईस ब्रेल या  शास्त्रज्ञाने अंधांसाठी ब्रेल लिपी शोधून काढून अंध दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात प्रकाश दिला; त्यांना त्याच्या पायावर उभे केले ते परमेश्‍वरासारखे असल्याने त्यांची देव्हार्‍यात पुजा व्हावी, असे प्रतिपादन जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी जागतिक दिव्यांग  दिनानिमित्त प्राथमिक मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना केले. दि 3 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सभापती आव्हाड  बोलत होते. 

यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे, रूपचंद जगताप, सुर्यकांत मोरे, सुनिल बोराडे, निखिल घायतडक, रणदिवे,  सानप, गणेश आजबे, संदीप गायकवाड, ॠषीकेश बांबरसे, पोपटराव काळे, मुलानी, कदम, तागड, गीते, कल्पना झिझुरडे यांचेसह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, दिव्यांग लाभार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रथम लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेला फुलासह पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोपटराव काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शासनाने  दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. 1995 पासून दिव्यागांना कायद्याने 3 % आरक्षण दिले असून राजीव गांधी अपंग सहाय्यता योजनेत भरीव रकमेची वाढ केलेली आहे. अपंगांना डोळ्यासमोर ठेऊन सुलभ निवडणुकीची आखणी केलेली आहे. या प्रकारे दिव्यांग व्यक्तीसाठी त्यांच्या सुखसोईसाठी प्रशासन जागरूक आहे असे म्हटले.