Breaking News

स्वॅप मशिनद्वारे गंडा घालणारी टोळी अटकेतसातारा,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एटीएम कार्डद्वारे पेट्रोल पंपावर इंधन भरून त्यानंतर कार्डवरून वजा झालेले पैसे पुन्हा परत मिळवून पेट्रोल पंप व हॉटेलचालकांची फसवणूक करणारी टोळी वाठार स्टेशन पोलिसांनी जेरबंद केली. या आरोपींनी नाशिक, पुणे, नगर आदी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एस बँक, युनियन बँक, कार्पोरेशन बँक आदी बँकांचे एटीएम कार्ड जप्त केले असून त्यांच्याकडून एक लाख 32 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

वाठार पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी पेट्रोप पंपावर काही अज्ञात व्यक्तींनी एटीएम कार्डचा वापर करून स्वॅप मशिनचा वापर करून सहा हजार रुपयांचे पेट्रोल गाडीत भरले. मात्र, स्वॅपमशिन व एटीएम कार्डवर तांत्रिक गडबड करून खात्यातून वजा झालेली रक्कम पुन्हा त्याच खात्यावर जमा केली. सदरची बाब सदाशिव मल्लिशम बेलगुंफे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर नमुद संशयितांकडून एसबीआय, युनियन बँक व कार्पोशन बँकेचे एमटीम कार्ड व 1 लाख 32 हजारांची रोकड जप्त केली. याप्रकरणी संशयित आरोपी विजय धोंडीराम सूर्यवंशी (वय 29, रा. पंडितनगर सिडको नाशिक), योगेश नामदेव काळे (वय 27, रा. अंबड नाशिक), नीलेश अनंत ब्राम्हण (भिडे) (वय 31, रा. पिंपराळ गावठाण जळगाव), अश्पाक दस्तगिरी शेख (वय 30, रा. सिडको नाशिक), देवीदास कचरू शिंदे (वय 28, रा. जाधव संकुल, अंबड रोड नाशिक) व लक्ष्मीकांत केशवराव पाटील (वय 50, रा. चेतनानगर नशिक) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.