Breaking News

कोतवाल संघटनेचे मेहकर तहसिलदारांना निवेदन


मेहकर,(प्रतिनिधी): महसूलचा शेवटचा कणा असलेल्या कोतवालांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 39 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परंतु शासनाने अद्यापही त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथील आयुक्त कार्यालया समोर आंदोलन सुरू केले आहे. 

या आंदोलनाचा 39 वा दिवस आहे. परंतु शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली नाही. दरम्यान, आज महसुली संघटनांनी महाराष्ट्र भर काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे महसूल संघटनेचे उपाध्यक्ष अजय पिंपरकर यांनी सांगितले. आज मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे यांना कोतवाल व महसूल कर्मचार्‍यांनी निवेदन दिले. त्यामध्ये आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या युगात कोतवालांना केवळ पाच हजार रुपये पगार मिळतो. या पगारात आपले परिवाराच्या गरजा कशा भागवायच्या हा प्रश्‍न पडला आहे. दीड-दोन वर्षा आधीही अशाच प्रकारचे आंदोलन नागपूर येथेही करण्यात आले होते. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यांनी अद्यापही या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कोतवालांनी सांगितल.े