Breaking News

सीएम चषक हॉलीबॉल स्पर्धेचे वाघोली येथे भव्य उद्घाटनवाठार स्टेशन,(प्रतिनिधी) : मुकुंदराज काकडे : आत्ताची युवा पिढी ही मोबाईल आणि अन्य मार्गाने भरकटत चाललेली आहे. यांना या मार्गावरून रोखण्यासाठी  भारतीय जनता पक्षाच्या वतीने सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. आज वाघोली येथे सीएम चषक हॉलीबॉल स्पर्धेचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याहस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते तसेच हॉलीबॉल खेळाडू यांच्या उपस्थितीत या सीएम चषकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन कुमार भोईटे यांनी केले होते. सीएम चषकाचे मुख्य उद्दिष्ट आहे की, गोरगरीब लोकांना एक हात मदतीचा तसेच युवा पिढीच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या सीएम चषकाचे आयोजन केले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, व मान्यवरांच्या हस्ते हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ झाला.