Breaking News

स्त्रिया शेतकरी व दलितेतरांसाठी बाबासाहेबांचे मोठे योगदान : डॉ.लुलेकर


बुलडाणा,(प्रतिनिधी): जिजामाता महाविद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतीदिन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सिध्दार्थ मेश्राम  हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर यांचेसह बाबासाहेब भोंडे उपस्थित होते.

 प्रा. लुलेकर म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे कैवारी न म्हणता दलितेतरांसाठी मोठे योगदान आहे.ज्यामधे शेतकर्‍यासाठी विधीमंडळावरील पहिला मोर्चा, खोती पध्दत बंदचे आंदोलन तसेच स्मॉल होंल्डिंग इन इंडिया या पुस्तकामधे शंभर वर्षापुर्वी शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्या आजही प्रकर्षाने जाणवतात. त्याच प्रमाणे स्त्रियांच्या  मतदानाचा, संपत्तीचा व माणुस म्हणुन बरोबरीचा अधिकारही फुले, आंबेडकरांच्या कार्याची देण आहे.असे विचार त्यांनी व्यक्त केले.

रवींद्र इंगळे चावरेकर यांनी महापरिनिर्वाणा नंतर बाबासाहेबांनी दिलेल्या त्यांच्या सर्वात मौलिक अश्या धर्म,धम्म,अधम्म, सदधम्म ह्या संकल्पना समजुन घेणे सध्याच्या काळात महत्वाच्या आहेत. याप्रसंगी बाबासाहेब भोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या चमुने अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविक डॉ.सुनिल मामलकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा.मिलींद जाधव यांनी केले. प्रा. संजय पोहरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. इंदुमतीताई लहाने, रमेश घेवंदे, नरेंद्र लांजेवार, सुरेश साबळे  यांचेसह शहरातील मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.