Breaking News

केडगाव मध्ये पुन्हा रक्तपात, एकाचा खून


केडगावमध्ये पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉटेल अंबिका परिसरात शनिवारी (दि.१५) रात्री ही घटना घडली.  संतोष पाचारणे असे मयताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे केडगाव पुन्हा चर्चेत आले आहे.

संतोष पाचारणे व बाळु पाचारणे हे दोघे अंबिका हॉटेलच्या मागील बाजूस वस्तीमध्ये राहतात. पैशावरुन दारुच्या नशेत दोघांचे वाद झाले व मारहाणीत संतोष याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. हे दोघे भाऊ असल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी मात्र अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसून शवविच्छेदन अहवाल आल्यावर याबाबत अधिक माहिती मिळेल, असे सांगितले जात आहे.