Breaking News

अनुसुचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लागु नये : टारपे

 घाटबोरी,(प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील माळेगांव येथे 2 डिसेंबर रोजी आदिवासी समाजाच्या वतिने वीर बिरसामुंडा जयंती व संविधान दिन साजरा करण्यात आला.

 यावेळी श्रीमती नंदिनी टापरे म्हणाल्या की आमच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोताही धक्का लागू नये व इतर जाती व जातीचा समावेश करू नये असे आहवान केले. क्रांतिविर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती व संविधान दिनाच्या कार्यक्रमा त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थितांनी विर बिरसा मुंडा यांच्या जिवन चारित्रावर प्रकाश टाकून  संविधानाचे महत्व विषद केले.

 आदिवासी समाजातील क्रांतीविर भगवान बिरसा मुंडा यांच्या 143 व्या जयंती निमित्त त्यांचे  विचार  प्रत्येक आदिवासींच्या मनामध्ये रूजवून प्रत्यक्षात आणण्यासाठी संविधानाने आदिवासी बांधवाना समाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये समाजाचे आस्तित्व निर्माण केले पाहीजे असे सांगीतले.यावेळी विष्णु फूपाटे, चिंतामण मिरासे, दत्तात्र्यय खरोवड, नारायण माहोरे, राजेश टारपे, सुनिल वरखडे आदींनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी मनोहर गाढवे होते. उदघाटक जि.प.चे माजी अध्यक्ष भास्करराव ठाकर होते.