Breaking News

गुंडा राजला मोडून काढण्यासाठी आघाडीला मतदान करणे गरजेचे.


राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीची प्रभाग क्रमांक 3 मध्ये महासभेने सांगता - तर आघाडीच्या 4 ही उमेदवारांना मतदान करण्याचा जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे आवाहन. 
अहमदनगर महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली आहे दरम्यान अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीच्या प्राचाराची सांगता मुकुंदनगर येथील दरबार चौक येथे महासभेने करण्यात आली

दरम्यान आयोजित या महासभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील, माणिकराव वीधाते, संग्राम कोते तर कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, मुंबई येथील नगरसेवक अशरफ, आजमी सुजय विखे प्रभागातील आघाडीचे समद खान, सलीम शेख, इम्रान शेख, फारुक शेख यांच्यासह प्रभागातील नागरीक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीथ होते

महानगर पालिकेच्या या निवडणुकीत येणाऱ्या 9 तारखेला आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी विजय करण्याची विनंती करत विकास कामे करण्यासाठी भाजप - शिवसेना नव्हे तर फक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाला विजय करण्याची प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी दिली आहे

तर राज्यात आणि देशात ज्या पद्धतीने गुंडा राज सुरू आहे अश्या गुंडा राजला मोडून काढण्यासाठी आघाडीला मतदान करणे गरजेचे आहे कारण लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीचा पाया हे महानगरपालिका असल्यानेच या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस च्या आघाडीला मतदान करण्याच आह्वान बाळासाहेब थोरात यांनी प्रभागातील नागरिकांना केला आहे

प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी पक्षाचे समद खान शेख सलीम आणि कॉंग्रेस पक्षा कढुन शेख शबनम इम्रान आणि रीजवाणा फारुक शेख हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनाच विजयी करण्याचे आह्वान या सांगता सभेवेळी करण्यात आले यावेळी प्रभागातील नागरीक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीथ होते