Breaking News

अंबाजोगाईत पाच लाखांची रोकड लंपास


बीड, (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून पाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना दुपारी घडली.अंबाजोगाई शहरातील लोहिया बंधू यांची कार प्रशांत नगर येथील दुकानासमोर उभी असतांना अज्ञात चोरट्याने गाडीच्या काचा फोडून कारमधील बॅगेत ठेवलेली पाच लाखांची रोकड लंपास केली अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.