Breaking News

कुलगुरु प्रा. विलास गायकर यांची नगर कॉलेजला भेट


नगर । प्रतिनिधी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विलास गायकर यांनी येथील अहमदनगर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी त्यांचा सत्कार करुन महाविद्यालयाची माहिती दिली. 
याप्रसंगी डॉ. एन. आर. सोमवंशी, प्रा. डॉ. बी. एम. गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. कमलाकर भट, डॉ. शंकर थोपटे आदी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु प्रा. गायकर यांनी विविध विभाग आणि संशोधन केंद्रास भेट देऊन विभाग प्रमुख, संशोधक प्राध्यापक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच रसायनशास्त्र, बायोटेक्नोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागांना भेट दिली. यावेळी ते म्हणाले, अहमदनगर महाविद्यालय हे नगर शहराची एक मोठी ओळख असून या महविद्यालयातील विद्यार्थी आज विविध देशात चांगली कामगिरी करत देशाच्या आणि शहराच्या नावलौकिकात भर टाकत आहेत. त्यामुळे महाविद्यालय नगर शहरासाठी एक विद्यापीठच आहे.