Breaking News

कृषी पंपाना आठ तास वीज, सौर वीज निर्मितीला प्रोत्साहन - विश्‍वास पाठक बुलडाणा,(प्रतिनिधी):  राज्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करून ग्राहकांना अखंडीत वीज पुरविण्यासाठी महावितरण आणि महापारेषणचे जाळे सक्षम करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार वर्षात सुमारे 3300 मेगावॅट निर्मिती क्षमतेची वाढ करण्यात आली असून ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण कंपन्यांची चार वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी केले.

 मलकापूर येथे आज 3 डिसेंबर रोजी  पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, ऊर्जामंत्री यांचे माध्यम सल्लागार विवेक जोशी आणि प्रभारी अधिक्षक अभियंता बद्रीनाथ जायभाये  यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्‍वास पाठक यांनी सांगितले, शेतकरी केंद्रबिंदू मानून विदर्भ मराठवाडयातील कृषीपंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. सुमारे पाच लाख कृषी पंपाना वीज जोडणी तसेच आठ तास वीजपुरवठा देवून सौर विज निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. वीज ग्राहक सेवा, भारनियमन मुक्त महाराष्ट्र, घराघरात वीज पोहविण्याच्या त्रीसुत्रीवर आधारीत योजना राबविण्यावर तसेच विजदर नियंत्रणात आणण्यासाठी  राज्य सरकार प्रयत्नशिल  आहे.  एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले, एखादा वीज प्रकल्प रखडला तर त्याचा भार सर्वसामान्यांच्या वीज बिलावर पडतो हे चुकीचे आहे.

संबंधित कंपनी सोबत करारनामा झाल्या प्रमाणे त्यांच्याडून तो खर्च वसूल केला जाते.  महावितरणच्या ग्राहकात गेल्या 4 वर्षात 35 लाखाने वाढ झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळेच  2014मध्ये 15 मेगावॅट असलेली विजेची माणगी ही आता 25 हजार मेगावॅट पर्यत वाढली आहे. 22 ऑक्टोबर 2018 रोजी 25 हजार मेगावॅट वाढलेली विजेची मागणी महावितरणने कोणत्याही अडचनिशिवाय पुर्ण केली असल्याचे विश्‍वास पाठक यांनी सांगितले.