Breaking News

बहुजन वंचित आघाडीचा जवाब दो मोर्चा


माजलगाव, (प्रतिनिधी):-एम आय एम व भारीपच्या बहुजन वंचित आघाडीच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी जवाब दो आंदोलन करत भव्य मोर्चा सोमवार रोजी माजलगाव नगर परिषद वर काढण्यात आला.

२०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये दलित वस्ती सुधार योजना, गलिच्छ वस्ती सुधार योजना, ओपनपेस विकास निधी किती आला, चालू करण्यात आलेली पाईप लाईन टेंडर न काढता चालू करण्यात आली त्याची माहिती द्यावी,शौचालयाचे काम पूर्ण न करता अर्धवट करून काही लोकांनाच पैसे दिले व काही लोकांचे पैसे विनाकारण अडवण्यात आले आहेत ते त्वरित देणे, बंद पडलेली शौचालय बांधकामाचे योजना पुन्हा सुरू करावी, मुख्य रस्त्यावर मुतारी बांधण्यात यावी,मोढा येथील पाणी टाकीचे बांधकाम सुरु करणे,संपूर्ण शहरात नाली सफाई करण्यात यावी, यासह इतर मागण्या साठी सोमवार रोजी एम आय एम व भारिप च्या बहुजन वंचित आघाडीच्यावतीने जवाब दो आंदोलन करत भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी एमआयएमचे जिल्हाधेक्ष शेख निजाम, भारीक जिल्हा सचिव धम्मानंद साळवे, बबन वडमारे, अनिल डोंगरे, तालुकाउपध्यक्ष समशेर पठाण, रमेश सर,शाकीर भाई शेख, शेख नजीर, आनंद साळवे, बबन वडमारे, शेख नजीर ,रौफ लाला, मोमिन शेख, सादिक शेख, हाफेस मौलाना, इत्यादीसह मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष यांची उपस्थिती होती