Breaking News

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा


आष्टी, (प्रतिनिधी)- तुला नांदायचे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियंका सचिन वनवे (रा. भेलेगाव फाटा, अहमदनगर, ह. मु. मुरडी, ता. आष्टी) असे विवाहितेचे नाव आहे. पती सचिनसह सासरच्यांकडून तिचा पैशासाठी वारंवार छळ केला जात होता. तसेच नांदायचे असेल तर रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा सोडचिठ्ठी दे असे म्हणून प्रियंकाला मारहाण केली जात होती. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर प्रियंकाला मुलीसह माहेरी सोडून सासरच्यांनी पळ काढला. याप्रकरणी प्रियंकाच्या फिर्यादीवरुन पती सचिनसह सासरा अजिनाथ, सासू कल्पना, दीर सुनील यांच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.