Breaking News

ज्योती भोसले आदिवासी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील पारधी समाज संघटनेच्या मार्गदर्शक महिला नेत्या ज्योतीताई भोसले यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देण्यात येणारा आदिवासी भूषण पुरस्कार बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. 

आदिवासी महिलांना न्याय हक्काची जाणीव करून देऊन त्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून पारधी समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी काम करत असल्याबद्दल ज्योतीताई भोसले यांना हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार सोहळ्याप्रसंगी  व्ही.जी. रेड्डी, बाळासाहेब बागुल, हनिफभाई पठाण, शेख विराट  प्रदीप सरोदे,  शांतवन खंडागळे यावेळी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ज्योती भोसले यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.