Breaking News

बुलडाणा जिल्हा नवरत्न पुरस्कार थाटात वितरण


 बुलडाणा,(प्रतिनिधी): मनात कुठलाही आंधळा स्वार्थ न बाळगता खर्‍या अर्थाने काहीतरी सामाजिक कार्य केले पाहिजे. कोणतेतरी ध्येय निश्‍चित करून जर एखादे चांगले कार्य केले तर ते सिद्धीस जाते. अशीच सामाजिक जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. शिवसैनिकांनाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारणाचीच शिकवण दिली. हाच दृष्टिकोन बाळगून शिवसेनेच्या वतीने स्वार्थी नव्हेतर ध्येय निश्‍चित करणार्‍या समाजातील खर्‍या नवरत्नांचा सन्मान झाला आहे, असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले.

येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 2 डिसेंबर रोजी शिवसेना तालुका प्रमुख डॉ.मधुसूदन सावळे यांचे वतीने बुलडाणा जिल्हा नवरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खा.जाधव अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी विचारपिठावर आ.डॉ.संजय रायमूलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,शांताराम दाणे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बढे, संघटक जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंपणे, उप जिल्हा प्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, रामदास चौथनकर, रवी पाटील, गजेंद्र दांदडे आदींची उपस्थिती होती.यावेळी पंधरा व्यक्ती व एका संस्थेचा शाल,श्रीफळ व पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देऊन खा.प्रतापराव जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका प्रमुख डॉ.मधुसूदन सावळे यांनी या पुरस्कारासाठी डॉ.गणेश गायकवाड व नरेंद्र लांजेवार यांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी निवडलेल्या पुरस्कारातील नावांची पाहणी करून आपण हिरवी झेंडी दिली. असे सांगून पुरस्काराबद्दल माहिती दिली. यातुन समाजकारण करत असल्याचेही त्यांनी मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चंद्रशेखर जोशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेतकरी विधवांची मुले व अनाथ बालकांना नंदनवनच्या माध्यमातून आश्रय देऊन शिक्षण देणार्‍या साखळी येथील नंदनवन या संस्थेला या वेळी मदत करण्यात आली.

नंदनवनचे दराखे यांचा चांगल्या कार्याबद्दल सन्मान करत प्रकल्पासाठी पाच हजार रुपयाचा धनादेश खा.जाधव यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ.मधुसूदन सावळे यांचेवतीने ही मदत करण्यात आली. कलाक्षेत्र योगेंद्र गणेश गुळवे, साहित्य क्षेत्र लिलाबाई दिनकर जोशी, संगीत कैलास दत्तात्रय कोल्हे, शिक्षणक्षेत्र नाजीमखान पठाण,राजेंद्र कोल्हे,क्रीडा क्षेत्र पूनम दिनकर सोनुने,पत्रकारिता रणजितसिंग राजपूत, वैद्यकीय क्षेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पंडित, कृषिरत्न ज्ञानेश्‍वर जगदेवराव गायकवाड,उद्योग क्षेत्र डॉ.सुकेश झंवर,संशोधन डॉ.दीपक नागरिक, लोककला शाहीर गणेश गणपत कदम, विशेष समाजकार्य राम विश्‍वनाथ मोहिते,विशेष समाज प्रबोधन मधुकर नानाभाऊ लहाने,योग व वृक्षारोपण सूर्योदय योगा परिवार, रुग्णसेवेमध्ये विशेष कार्य गजानन रघुनाथ कडुकार हे नवरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले