Breaking News

जातीयवादी महिला पोलिस अधिकार्‍यावर कडक कारवाईची मागणी


जामखेड/प्रतिनिधी 
जातीयता मनात बाळगून दलितांना त्रास देणार्‍या माजलगाव जि. बीड येथील एका महिला पोलीस आधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शासन करण्याची मागणी जामखेड येथील समस्त भिम सैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून  सोशल मिडीयारून व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एक वरिष्ठ महिला पोलीस आधिकार्‍यांने जातीय द्वेषातून दलितांविरोधात बोलतांना दिसत आहे. दलितांना बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. 

यापूर्वी जातीय द्वेष भावना ठेवून दलित मुस्लिमांना त्रास दिला असल्याचे दिसून येत आहे. एका जबाबदार महिला पोलीस आधिकार्‍यांच्या मनात जातीयता मनात बाळगून काम करणे ही पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना आहे. जनतेचे रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेने कुठे न्याय मागावा. अशा महिला पोलीस आधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शासन करण्यात यावे. असे समस्त भिमसैनिकांच्या वतीने जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहरासह तालुक्यातील समस्त भिमसैनिक उपस्थित होते.