Breaking News

४२वे गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन.


मुंबई : गुणीदास संगीत संमेलन या अत्यंत प्रतिष्ठित अशा वार्षिक संगीत महोत्सवाच्या ४२व्या पर्वामध्ये शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यात तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन, प्रख्यात गायक पंडित सुहास व्यास, कौशिकी चक्रवर्ती आणि संजीव चिम्मलगी, प्रख्यात व्हायोलिनवादक कला रामनाथ, सरोदवादक अयान अली बंगश, वीणावादक जयंती कुमारेश आणि युवा संतूरवादक कुणाल गुंजाळ यांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या ४२व्या गुणीदास संगीत संमेलनाची सुरुवात ७ डिसेंबर रोजी नेहरू सेंटर येथे होत असून, दोन्ही दिवशी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे..