Breaking News

अवैध वाळूसाठयावर धनेगावला महसूलचा मध्यरात्री छापा


जामखेड चे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांची पोलिस पथक सह  धडाकेबाज कारवाई 


जामखेड तालुक्यातील धनेगाव भागात  राजरोजपणे सुरू असलेल्या वाळू तस्काराविरोधात तहसिलदार नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून सुमारे ६० ते ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला 

जामखेड महसुल विभागाच्या इतिहासातील आज पर्यंत ची ही सर्वात मोठी बेधडक कारवाई मानली जाते महसुल विभागाने वाळू साठे जप्त केले मात्र कोणाच्या शेतात कोणी वाळूचे साठवण केली होती त्या वाळू तस्काराचे नावे अजून पुढे आले नाही त्या वाळू तस्कराविरोधात महसुल काय कारवाई करतात याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे