अंगावर रॉकेल ओतून महिलेची आत्महत्या


जामखेड/प्रतिनिधी
माहेरी राहत असलेल्या राखी उर्फ बाणी राजेश विरमानी वय 40 वर्षे. रा.सर्जेपुरा.अहमदनगर हल्ली.राहणार .तपनेश्‍वर गल्ली, जामखेड या महीलेने आपल्या रहात्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत ती शंभर टक्के भाजली असल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मयत राखी विरमानी ही महीला काही वर्षांपासून आपल्या माहेरी आपला भाऊ राजेंद्र आहुजा यांच्या घरी रहात होती.

दि. 3 रोजी सकाळी 10.30 वा तीचे भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. या वेळी तीची आई व ती दोघीच घरी होत्या. त्या नंतर काही वेळातच तीने घरातील बाथरुम मध्ये अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या वेळी तीने आरडा ओरडा केला असता तीची आई तीला विझवण्यासाठी धावत आली. त्यावेळी तीला विझवत असताना तीच्या आईचा हात भाजल्याने ती देखील जखमी झाली. सदर घटनेची माहिती समजताच केमिस्ट असोसिएशनचे माऊली गायकवाड यांनी आपल्या रुग्णवाहिकेतुन जखमी महीलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ती शंभर टक्के भाजली असल्याने तिचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. तिच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात जामखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास एन.एम.कांबळे हे करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget