Breaking News

राजूर येथे कराटे प्रशिक्षणाचे वर्गाचे आयोजन


राजुर/प्रतिनिधी
राजुर येथील अ‍ॅड एम. एन. देशमुख महाविद्यालयात विदयार्थी विकास मंडळाच्या निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षणाचा वर्ग आयोजित करण्यात आला होता. अलीकडच्या काळात मुलींना छेडछाड, रोड रोमीओंचा त्रास, तर कधी कधी टोकाची आणीबाणीची परीस्थितीला सामोरे जावे लागते. अशा बहुतेक प्रसंगी आजुबाजूचे लोकही केवळ बघ्याची भुमिका घेतात, मदतीस कोणीही पुढे येत नाही, अशा प्रसंगी मुलींना आपले स्वसंरक्षण करता यावे, यासाठी कराटे प्रशिक्षक मा.सुभाष मिंडे व सरला मिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी सहजपणे, सामान्य मुलींना सुद्धा आणीबाणीच्या प्रसंगातुन आपली सुटका करून घेता येईल, समोरच्या व्यक्तीचा वार चुकविता येईल किंवा त्यास प्रतिकार करता येण्याचे, काही कराटे कौशल्य मुलींना शिकविले. अशा प्रशिक्षणाचा व कराटे कौशल्याचा नियमित सराव केल्यास आम्हांस नक्कीच फायदा होईल अशा प्रतिक्रिया महाविद्यालयीन युवतींनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य, डॉ .बी.एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थी विकास आधिकारी प्रा. संजय कडलग यांनी केले होते, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रेखा कढणे, डॉ. सोनवणे, प्रा. काकडे एल.बी. प्रा. संतोष अस्वले प्रा. प्रवीन घारे यांनी सहकार्य केले.